गोसेवा विकास

सेवा आयोगाचा मुख्य उद्देश

    १. महाराष्ट्र राज्यातील देशी गोवंशा चे संरक्षण, संवर्धन आणि कल्याण यांना प्रोत्साहन देणे आणि त्यासाठी काम करणाऱ्या संस्थांवर लक्ष ठेवणे.
    २. गौसदन, गोशाळा, पांजरपोळ आणि गोरक्षण संस्थांची नोंदणी.
    ३. विद्यमान कायद्यांतर्गत देशी गोसंवर्धन सुनिश्चित करणे.
    ४. गौसदन, गोशाळा, पांजरपोळ व गोसंरक्षण संस्था यांच्या विकासाशी संबंधित राज्य शासनाचे कार्यक्रम व योजनांची अंमलबजावणी होईल याची खात्री करणे.
    ५. गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजना आणि इतर योजनांचा समावेश आणि अंमलबजावणी करणे.
    ६. महाराष्ट्र राज्यातील देशी गोवंशाच्या विकासामध्ये संस्थांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करणे.
    ७. पशु आरोग्य सेवांचे संचालन.
    ८. विद्यमान कायद्यांचे उल्लंघन केल्याबद्दल जप्त केलेल्या प्राण्यांची काळजी आणि व्यवस्थापन सुनिश्चित करणे.
    ९. नोंदणीकृत संस्थेद्वारे पाळलेल्या कमकुवत, वृद्ध आणि रोगग्रस्त जनावरांचे योग्य व्यवस्थापन, काळजी आणि उपचार सुनिश्चित करणे.
    १०. पशुधन व्यवस्थापनाबाबत शेतकरी आणि इतर भागधारकांसाठी जनजागृती आणि प्रशिक्षणाची अंमलबजावणी सुनिश्चित करणे.
    ११. महाराष्ट्र राज्याच्या बोवाइन प्रजनन धोरणाच्या अंमलबजावणीची खात्री करणे आणि त्यावर देखरेख करणे.


    गो-१० धोरण

    1. गो संगोपन              6. गोरक्षक
    2. गो संवर्धन               7. गोपालक
    3. गो संरक्षण               8. गो आधारित शेती
    4. गोमय मुल्यवर्धन        9. गो साक्षरता
    5. गोशाळा                 10. गो पर्यटन

१) गो संगोपन

  • शुद्ध जातीच्या गोवंश वाढीसाठी योग्य रेतमात्रा वापरून शासनाच्या प्रजनन धोरणाची प्रभावीपणे अंमलबजावणी राबविणे.
  • बैल वाढविण्यासाठी उत्तम संगोपन पद्धतीला प्रोत्साहन देणे.
  • नामशेष होत असलेल्या देशी गोवंशाच्या संख्यात्मक व गुणात्मक वाढीकडे लक्ष देणे.
  • पशुआरोग्य सेवांचे प्रचालन करणे, त्या अंतर्गत राज्यातील पशुंची निगा राखणे, त्यांना आरोग्यविषयक उत्तम दर्जाच्या सेवा उपलब्ध करुन देणे.
  • पशुंना निवारा (गोठे) उपलब्ध करुन देणे, पशुंना सकस आहार उपलब्ध करून देणे.
  • पशुव्यवस्थापनासंबंधी शेतकरी पशुपालकांना तसेच गोशाळेमधील सेवकांना वेळोवेळी तांत्रिक प्रशिक्षण व मार्गदर्शन.
  • गोवंशाचे लसीकरण, आरोग्यविषयक विविध सेवांसाठी शासकीय फिरते वाहन उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करणे.

२) गो संवर्धन

  • गोवंशाची देखभाल शास्त्रशुद्ध पद्धतीने करण्यासाठी गोशाळांना प्रोत्साहीत करणे, जेणेकरुन पशुंचे व्यवस्थापन सुधारेल, त्यांना चारा व आहार यांची उत्तम सोय होईल.
  • उत्कृष्ट जातीचा चारा उत्पादीत करण्यासाठी शासकीय वैरण विकास योजनांतर्गत गोशाळांना अनुदान देणे.
  • गोधनापासून उत्पादीत दूध, तूप, पंचगव्ये यासारख्या मुल्यवर्धित उत्पादनांच्या वाढीकडे विशेष लक्ष देणे.
  • राज्यातील देशी जातीच्या पशुंच्या विकासासाठी सामाजिक संस्थांच्या सहभागाची सुनिश्चिती करणे.
  • राज्यातील सर्व गोवंश पशुधनांना टॅगींग (ओळख क्रमांक) करणे.

३) गो संरक्षण

  • राज्यात गोवंशाची होणारी कत्तल (२०१५ च्या प्राणीरक्षण कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी) तसेच अपघातापासून गोवंशाचे संरक्षण करणे.
  • गोवंशाची विक्री करणाऱ्या शेतकऱ्याला मोबदला देऊन गोवंशाची खरेदी करणे.
  • गोवंशांचा सांभाळ करू न शकणाऱ्या शेतकऱ्याला आर्थिक आधार देणे जेणेकरुन तो गोधनाची विक्री करणार नाही.
  • कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या गोधनाची सुटका करुन त्यांची रवानगी गोसेवा आयोगाकडील नोंदणीकृत गोशाळेत करणे.
  • पशुधनाच्या संरक्षणासाठी अस्तित्वात असलेल्या कायद्यांची अंमलबजावणी प्रभावीपणे करणे संदर्भात जागरुक राहणे.
  • जिल्हा प्राणी क्लेष प्रतिबंधक सोसायटी यांच्या वेळोवेळी बैठका आयोजित करुन त्यांच्या कामाचा आढावा घेणे.

४) गोमय मुल्यवर्धन

  • मातीचे नैसर्गिक चक्र पुनरुज्जीवित करण्यासाठी देशी गोवंशापासून मिळणारे शेण आणि गोमुत्रासह नैसर्गिक शेती करण्यास प्रोत्साहन देणे.
  • गोशाळेच्या स्वयंपूर्ण होण्यासाठी शेणखत व गोमुत्रासह उत्पादीत पंचगव्यांपासून गोमय उत्पादने तयार करुन त्यांना बाजारपेठ मिळवून देणे.
  • गोमय उत्पादनांसाठी प्रमाणित प्रयोगशाळा तयार करणे व गोसेवा आयोगाच्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर विक्रीस प्रोत्साहन देणे; जेणेकरुन शेवटच्या वापरकर्त्यास निरोगी जीवनासाठी उत्कृष्ट उत्पादने देऊन शेतकरी व गोशाळेचे अर्थकारण समृद्ध होईल, याकडे लक्ष देणे.
  • सेंद्रीय शेतीसाठी गोवंशाच्या शेणखताची दर निश्चिती करणे.

५) गोशाळा

  • राज्यामध्ये गोरक्षणासाठी (पशुंचे संवर्धन, संरक्षण व कल्याण) कार्यरत असणाऱ्या गोशाळांची नोंदणी करणे तसेच नव्याने सुरु होणाऱ्या गोशाळांची नोंदणी, त्यांचे निरिक्षण व पर्यवेक्षण करणे.
  • गोशाळेमध्ये गोधनासाठी संगोपनाच्या उत्तम व्यवस्थापन पद्धती, गोमुत्र संकलन, शेड, चारा व अन्य पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी अनुदान देणे.
  • सुधारीत गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजनेंतर्गत गोशाळेमधील पायाभूत सुविधांचे बळकटीकरण करणे.
  • गोशाळांमध्ये गोबरगॅस सयंत्र वापरास प्रोत्साहन देणे.
  • कत्तलीसाठी नेण्यात येणारा गोवंश जप्त करुन गोशाळांच्या माध्यमातून त्यांचे संरक्षण व व्यवस्थापन करणे, गोशाळांच्या विकासासाठी राज्य शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी होईल, याची सुनिश्चिती करणे.
  • आर्थिकदृष्ट्या कमकुवत गोशाळांचे बळकटीकरण करणे व त्यांना आर्थिक सहाय्य करणे.

६)गोरक्षक

  • जिल्हा प्राणी क्लेष प्रतिबंधक सोसायतीद्वारे जिल्ह्यातील गोरक्षकांना मान्यता व ओळखपत्र प्रदान करणे, त्यांना महसूल विभागाकडून विमा संरक्षण देणेबाबत कार्यवाही करणे.
  • गोवंशासाठी कार्यरत पोलिस, गोरक्षक, सरकारी वकिल यांचेसाठी उत्तम कार्यपद्धती अवलंबिणेकरिता एसओपी तयार करणे व त्याची काटेकोर अंमलबजावणी करणे व त्यांना कायद्याचे प्रशिक्षण देण्यासाठी जिल्हास्तरावर कार्यशाळेचे आयोजन करणे.


७) गोपालक

  • गो पालक म्हणजे गाईच्या संरक्षणाची, पालन-पोषणाची आणि प्रजनन याची जबाबदारी घेणारा व्यक्ती.
  • गो पालकांच्या कामांमध्ये गाईंची दुधप्रदर्शन, गाईंच्या पायांची देखरेख, गाईंच्या कुटुंबांची काळजी घेणे, गाईंच्या रोगांची काळजी घेणे, गाईंच्या संवर्धनाची काळजी घेणे व गाईंच्या दिनचर्येची काळजी घेणे ह्या सर्व कामांमध्ये योगदान असतो.

८) गो आधारीत शेती

  • मृदेची नैसर्गिक सुपीकता व कृषी चक्र पुनरुज्जीवित करण्यासाठी रासायनिक खतांच्या वापराला आळा घालून गो आधारीत सेंद्रीय शेतीला चालना देणे.
  • गोशाळांद्वारे सेंद्रिय खताची निर्मिती करण्यासाठी शासनाकडे योजना सादर करणे व त्यातंर्गत गोशाळांना अनुदान देणे.
  • बैलचलित यंत्र निर्मिती करुन अशा यंत्रांचा वापर शेतीत करण्यासाठी चालना देणे.
  • गो आधारीत सेंद्रीय शेती उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करुन देणे.

९) गो साक्षरता

  • सर्वसामान्य जनतेला देशी गाईची महती कळण्याहेतू प्रचार प्रसिद्धी करणे व अनुषंगिक कार्यक्रमांची अंमलबजावणी करणे.
  • गोशाळेमध्ये वाढदिवस किंवा इतर वैयक्तिक कार्यक्रमांचे आयोजनास प्रोत्साहन देणे.
  • गाईच्या पालनपोषणाच्या दृष्टीने गोसाक्षरता प्रशिक्षण देणे.
  • गोपालनातून रोजगाराच्या संधींची उपलब्धता वाढवणे.
  • गोशाळेमध्ये सर्वसामान्यांना गाई दत्तक घेण्याहेतू प्रोत्साहीत करणे.

१०) गो पर्यटन

  • गोसंगोपन व व्यवस्थापन जाणून घेण्यासाठी पर्यटकांकरिता गोशाळांना भेटीचे आयोजन.
  • गोशाळांमध्ये लहान मुलांसाठी खेळ व मनोरंजन कक्ष उभारणे.
  • गोसंवाद साधणे, दूधदोहन कार्यात सहभाग व गोशाळेचे दैनंदिन कामकाज समजावून घेणे.
  • गोमय मुल्यवर्धित उत्पादने तयार करणेकरिता कार्यशाळा आयोजित करणे.
  • स्थानिक व्यवसायांच्या वाढीस प्रोत्साहन देणे, जसे की होम स्टे, क्राफ्ट शॉप्स व सेंद्रिय उत्पादने बाजार.
  • शैक्षणिक सहलीचे गोशाळांमध्ये नियोजन करणे व त्यासाठी गोसाक्षरता कक्षाची निर्मिती करणे.
  • गोमय उत्पादन तयार करण्याबाबत गोशाळांमध्ये विशेष कक्षाची उभारणी करणे.