Profile

डॉ. शामकांत अंजनाबाई प्रभाकर पाटील

(सदस्य सचिव महाराष्ट्र गोसेवा आयोग)

अधिक माहिती

  • नाव: डॉ. शामकांत अंजनाबाई प्रभाकर पाटील
  • पद: सदस्य सचिव महाराष्ट्र गोसेवा आयोग
  • शिक्षण आणि अहर्ता: M. V. Sc (Physiology and Biochemistry).
  • कार्यालय पत्ता: पशुसंवर्धन आयुक्तालय, पहिला मजला, स्पायसर कॉलेज समोर, औंध-खडकी रोड, औंध, पुणे-411067

"गोसेवा आयोग हा गायींच्या संवर्धन, संरक्षण आणि कल्याणासाठी कार्य करणारा एक महत्त्वाचा आयोग आहे. गायींची सेवा व देखभाल करण्यासाठी विविध योजना आणि उपक्रम हाती घेण्यात येतात."


शासकीय सदस्य

अ. क्र.सदस्याचे नावपदनाम
श्री. शेखर मुंदडा(अशासकीय सदस्य)अध्यक्ष
डॉ. प्रविण देवरे, मा. आयुक्त पशुसंवर्धनपदसिद्ध सदस्य
डॉ. शामकांत अंजनाबाई प्रभाकर पाटीलसदस्य सचिव
डॉ. सुनील चव्हाण, आयुक्त कृषि (कृषि विभाग)पदसिद्ध सदस्य
श्री. एस. शिरपुरकर आर. (दुग्धव्यवसाय विभाग)पदसिद्ध सदस्य
श्री. विवेक भीमनवार (आयुक्त परिवहन)पदसिद्ध सदस्य
श्री. . नि. भा. मराळे, उपसचिव पशुसंवर्धन (सचिव (पदु) पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय)पदसिद्ध सदस्य
श्री. . राहूल गो. मामू, धर्मादाय उपायुक्त (धर्मादाय आयुक्त कार्यालय)पदसिद्ध सदस्य
श्री. श्रीमती वर्षा मु. भरोसे, सहसचिव, (पंचायत राज) (ग्रामविकास विभाग, मंत्रालय, मुंबई)पदसिद्ध सदस्य
१० डॉ. माधव वीर, (वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई)पदसिद्ध सदस्य
११श्री. अजिंक्य वसंत बगाडे, उपसचिव नगर विकास पदसिद्ध सदस्य
१२ श्री. महाजन, उपसचिव, गृह विभाग पदसिद्ध सदस्य
१३ श्री. शैलेश टेंभुर्णीकर आयुक्त, वन (वन विभाग) पदसिद्ध सदस्य
१४श्री. अनिल भिकाने, संचालक, विस्तार शिक्षण (महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर) पदसिद्ध सदस्य
१५डॉ. सोमनाथ हनुमंत माने, प्रमुख शास्त्रज्ञ, कृषी महाविद्यालय, पुणे (महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी) पदसिद्ध सदस्य

अशासकीय सदस्य

अ. क्र.सदस्याचे नावपदनामसंपर्क
श्री. सुनिल सूर्यवंशीसदस्य९३७१४०५१०४
श्री. संजय भोसलेसदस्य९६८९८८०७९६
डॉ नितिन मनमोहन मार्कंडेयसदस्य९४२२६५७२५१
श्री. सनत कुमार गुप्तासदस्य९८९०५५९६७६
श्री. उद्धव नेरकरसदस्य९५११६२८७९२
श्री. दीपक भगतसदस्य९४२२३७९९२७
श्री. परेश हरदास शाहसदस्य९८१९३०१२९८
श्री. मनीष श्रीनिवास वर्मासदस्य९४०४००३६९१

स्थापना - दिनांक. २८.०४.२०२३

राज्यात अमलबजावणी - दिनांक- १०.०५.२०२३

राज्यात कार्यान्वयन - दिनांक- ०७.०७.२०२३

कार्यालय - महाराष्ट्र गोसेवा आयोग मुख्यालय, पशुसंवर्धन आयुक्तालय, औंध, पुणे-६७

गोसेवा आयोगबद्दल


महाराष्ट्र गोसेवा आयोगाविषयी

  • महाराष्ट्र गोसेवा आयोग अधिनियम २०२३ अधिनियमित असून दि. २८.०४, २०२३ रोजी तो शासन राजपत्रात प्रसिध्द करण्यात आला असून दि. १०:०५, २०२३ रोजीच्या अधिसूचनेद्वारे राज्यात लागू करण्यात आला.
  • दि. ०७.०७.२०२३ च्या अधिसूचनेद्वारे महाराष्ट्र गोसेवा आयोगासाठी पुढील तीन वर्षासाठी खालील अशासकीय सदस्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे
  • महाराष्ट्र राज्यामध्ये देशी गोवंश संवर्धन, संरक्षण व कल्याण करणे व त्यासाठी कार्यरत असणाऱ्या संस्थांचे पर्यवेक्षण करणे.
  • गोसदन, गोशाळा, पांजरपोळ व गोरक्षण संस्थांची नोंदणी करणे.
  • अस्तित्वात असलेल्या कायद्याअन्वये देशी गोवंश संरक्षणाची सुनिश्चिती करणे.
  • गोसदन, गोशाळा, पांजरपोळ व गोरक्षण संस्था यांच्या विकासासंबंधीचे राज्यशासनाचे कार्यक्रम व योजना यांची अंमलबजावणी होईल हे सुनिश्चित करणे.
  • गोवर्धन गोवंश सेवा केन्द्र योजना व इतर योजना अंतर्भुत करणे व त्याची अंमलबजावणी करणे.
  • महाराष्ट्र राज्यातील देशी जातींच्या गोवंश विकासामध्ये संस्थांच्या सक्रिय सहभागाची सुनिश्चिती करणे
  • पशुआरोग्य सेवांचे प्रचालन करणे.
  • अस्तित्वात असलेल्या कायद्यांचे उल्लंघनाकरिता जप्त केलेल्या पशुची काळजी व व्यवस्थापनाची सुनिश्चिती करणे.
  • नोंदणीकृत संस्थेद्वारे देखभाल करण्यात येणाऱ्या दुर्बल, वयस्क व रोगग्रस्त पशुंचे योग्य व्यवस्थापन, काळजी व उपचार यांची सुनिश्चिती करणे.
  • पशुव्यवस्थापनासंबंधी शेतकरी व इतर हितसंबंधित व्यक्ती यांच्याकरिता जनजागृती व प्रशिक्षण यांची अंमलबजावणीची सुनिश्चीती करणे.
  • महाराष्ट्र राज्याच्या गोवंश प्रजनन धोरणाच्या अंमलबजावणीची सुनिश्चिती करणे व त्याचे संनियंत्रण करणे.
  • अधिनियमान्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करण्यासाठी आणि नेमून दिलेले कार्य पाडण्यासाठी दि.०१.०९.२०२३ चे अधिसूचनेद्वारे ” महाराष्ट्र गोसेवा आयोग ” म्हणून २२ सदस्यांचे मंडळ गठित करण्यात आलेले आहे. आयोगावर विविध शासकीय विभागातील १४ पदसिध्द सदस्य आहेत. यामध्ये आयुक्त पशुसंवर्धन यांचा पदसिध्द सदस्य म्हणून समावेश आहे. आयोगावर पशुकल्याण, प्राणी व्यवस्थापन, पशुवैद्यकीय विज्ञान, दुग्धव्यवसाय, जैवतंत्रज्ञान, पणन, कायदा, सामाजिक कार्य किंवा आधुनिक तंत्रज्ञान या क्षेत्रातील तसेच अशासकीय संस्था, गोसदन, गोशाळा, पांजरपोळ व गोरक्षण संस्था इत्यादींचे प्रतिनिधी म्हणून ७ अशासकीय सदस्यांची नामनिर्देशनाने नेमणूक व त्यापैकी एका सदस्याची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. आयोगाचे सदस्य सचिव म्हणून कार्य करण्यसाठी सहआयुक्त पशुसंवर्धन हे पद असून इतर अधिकारी / कर्मचारी शासन नियुक्त असणार आहेत. आयोगाचे मुख्यालय आयुक्त पशुसंवर्धन कार्यालय, आंध्, पुणे-६७ येथील कार्यालयामध्ये दि. ०२.०९.२०२३ पासून तात्पुरत्या स्वरुपात स्थापित करण्यात आले आहे.

गोसेवा आयोगाची प्रमुख उदिष्टे

  • महाराष्ट्र राज्यामध्ये पशुंचे संवर्धन, संरक्षण व कल्याण करणे व त्यासाठी कार्यरत असणाऱ्या संस्थांचे पर्यवेक्षण करणे.
  • गोसदन, गोशाळा, पांजरपोळ व गोरक्षण संस्थांची नोंदणी करणे. अस्तित्वात असलेल्या कायद्याअन्वये पशुंच्या संरक्षणाची सुनिश्चिती करणे.
  • गोसदन, गोशाळा, पांजरपोळ व गोरक्षण संस्था यांच्या विकासासंबंधीचे राज्यशासनाचे कार्यक्रम व योजना यांची अंमलबजावणी होईल हे सुनिश्चित करणे.
  • महाराष्ट्र राज्यातील देशी जातींच्या पशुंच्या विकासामध्ये संस्थांच्या सक्रिय सहभागाची सुनिश्चिती करणे.
  • पशुआरोग्य सेवांचे प्रचालन करणे.
  • अस्तित्वात असलेल्या कायद्यांचे उल्लंघनाकरिता जप्त केलेल्या पशुंची काळजी व व्यवस्थापनाची सुनिश्चिती करणे.
  • जाती सुधारणा, वैरण विकास, मल, मुत्र व बायोगॅस, इत्यादी वर आधारित उद्योग आणि यासाठी विद्यापीठे आणि इतर संशोधन संस्था यांच्याशी समन्वय साधणे आणि नवीन वैज्ञानिक तंत्रज्ञान स्वीकारण्याचे कामी त्यांचे सहाय्य घेणे.
  • आर्थिकदृष्टया कमकुवत संस्थांना बळकट करणेसाठी सहाय्यकारी ठरतील अशा उपाययोजना सुचविणे.
  • संस्थांना आर्थिक सहाय्य देणे.
  • कोणत्याही संस्थांच्या कामकाजातील तक्रारींची चौकशी करणे.
  • पशुंवरील क्रुरतेला प्रतिबंध करण्याच्या कृतींचा आढावा घेणे.
  • जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक सोसायटीच्या कामाचा आढावा घेणे.
  • विहित करण्यात येतील अशी इतर कर्तव्ये पार पाडणे.
  • नोंदणीकृत संस्थेद्वारे देखभाल करण्यात येणाऱ्या दुर्बल, वयस्क व रोगग्रस्त पशुंचे योग्य व्यवस्थापन, काळजी व उपचार यांची सुनिश्चिती करणे.
  • पशुव्यवस्थापनासंबंधी शेतकरी व इतर हितसंबंधित व्यक्ती यांच्याकरिता जनजागृती व प्रशिक्षण यांची अंमलबजावणीची सुनिश्चीती करणे.
  • महाराष्ट्र राज्याच्या गोवंश प्रजनन धोरणाच्या अंमलबजावणीची सुनिश्चिती करणे व त्याचे संनियंत्रण करणे.
  • नोंदणीकृत संस्थांचे पर्यवेक्षण व निरीक्षण करणे.
  • वैरण व वैरणीचे बियाणे यांच्या सुधारित प्रकारांच्या लागवडीचे व उत्पादनाचे आणि कुरण विकास कार्याचे प्रचालन करणे.
  • महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर आणि पशुवैरण विकास कार्यक्रमांशी संबंधित इतर संशोधन संस्था यांच्या मध्ये समन्वय साधणे आणि नविन वैज्ञानिक तंत्रज्ञानाचा अंगीकार करणेसाठी संस्थांच्या सक्रिय सहभागाची सुनिश्चीती करणे.

देशी गाईचे प्रकार


महाराष्ट्रातील देशी गोवंश विविध प्रकारांमध्ये आढळतो, ज्यामध्ये डांगी, खिलार, लालकंधारी, देवणी, गवळावू आणि कोंकण कपिला या गायी प्रमुख आहेत. या गायींची विशेषता म्हणजे त्यांची स्थानिक हवामानाशी जुळवून घेण्याची क्षमता. या गायी मजबूत, टिकाऊ, आणि कमी देखभाल खर्चात चांगले दूध उत्पादन करतात. त्यांच्या दुधाचा पोषणमूल्य व चरबीची गुणवत्ता उच्च असते. महाराष्ट्रातील ग्रामीण भागांमध्ये या गायींचा उपयोग दूध उत्पादन, शेतीसाठी ओझं वाहणे, आणि स्थानिक अर्थव्यवस्थेत महत्त्वपूर्ण योगदान देण्यासाठी होतो.

डांगी गाय
डांगी गाय
खिलार गाय
खिलार गाय
देवणी गाय
देवणी गाय
गवळावू गाय
गवळावू गाय
लालकंधारी गाय
लालकंधारी गाय
कठाणी गाय
कोंकण कपिला
कोंकण कपिला
कोंकण कपिला
राठी गाय
Placeholder Image
कांकरेज गाय
Placeholder Image
रेड सिंधी
Placeholder Image
नागोरी गाय
Placeholder Image
कुंदी गाय
Placeholder Image
हरियाणा गाय
Placeholder Image
विचूर गाय
Placeholder Image
देवणी गाय
Placeholder Image
गीर गाय
Placeholder Image
थारपारकर गाय
Placeholder Image
पुंगनूर गाय
Placeholder Image
मालवी गाय
Placeholder Image
ओंगोल गाय
Placeholder Image
नेल्लोर गाय
Placeholder Image